Sunday, July 23, 2023

माथाडी कामगार ते आदर्श पिता ,माननीय श्री नारायण भगत

ऑलम्पिक राष्ट्रीय पुरस्कार समिती
मान अभिमान विकास फाउंडेशन
(कला ,क्रीडा सामाजिक शैक्षणिक आणि ओघोगीत पुरस्कृत)

ऑलम्पिकवीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सन- 2023
आदर्श पिता पुरस्कार
महाराष्ट्राच्या हृदयास सिंहासनावर आधी राज्य गाजवणारा पैलवान किरण नारायण भगत यांना घडवण्यामध्ये त्यांचे बापू म्हणजे पिताश्री  
श्री नारायण रामचंद्र भगत
यांचा सिंहाचा वाटा आहे . ग्रामीण भागापासून ते मुंबईमध्ये हमाली करेपर्यंत संपूर्ण प्रवास करणारे भगत कुटुंबे.
आपण मोठा पैलवान बनू शकलो नाही ही खंत सदैव बापूंच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी मनामध्ये ठरवले दोन्ही मुलांपैकी एक चांगला पैलवान बनवायचा आणि त्यांचे स्वप्न साकारले ते किरण व दुसरा मुलगा भारतीय सैन्यामध्ये भरती करून त्यांनी दाखवून दिले की सामान्यतः सामान्य माणूस मनात निश्चय केला तर काहीही करू शकतो. म्हणजे एक मुलगा लाल मातीची सेवा करतो तर दुसरा मुलगा भारत माता ची सेवा करतो.
माथाडी कामगार सेवानिवृत्ती झाल्यानंतर भगत कुटुंबीय शांत बसले नाहीत. कुस्तीशी नालबांधलेले कुटुंब गावाच्या सहकाऱ्यांनी गावामध्ये भव्य असं मॅट हॉल साकारण्यात आला.
तसेच गावामध्ये जुन्या काळातील मातीचा हौद आहे. त्यामध्ये सातत्याने गावातील मला सराव करतात. त्यामध्ये बापू जातीने लक्ष देतात.
त्याचप्रमाणे *पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन* (रजि) यांच्यामार्फत पंचक्रोशी मध्ये सामाजिक, स्वच्छता अभियान, वृक्षरोपण, रनिंग, कुस्त्यांच्या स्पर्धा अशा प्रकारे उपक्रम घेतले जातात.

बापूंचे मनोगत घेतले असता हा पुरस्कार माझ्या सर्व मोही ग्रामस्थांना व श्री महालक्ष्मी चरणी अर्पण

श्री नारायण रामचंद्र भगत (बापू)
यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन... .
  

शुभेच्छुक- 
श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)


मनापासून खूप खूप धन्यवाद
   मान अभिमान विकास फाउंडेशन

Friday, July 14, 2023

चंद्रयान - 3 प्रक्षेपण

14 जुलै 2023 आज ऐतिहासिक दिवस आज दुपारी 02.35 वा चंद्रयान - 3 प्रक्षेपण आहे आपण सर्व मिळून चंद्रयानाच्या सफल प्रक्षेपणासाठी प्रार्थना करू या..! भारत माता की जय
 



पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)


26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...