Sunday, April 14, 2024

मोही मध्ये मिनी व्यायाम शाळेचे पैलवान ना लाभ

  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही मॅट हॉल मध्ये मिनी व्यायाम शाळेचे उद्घाटन वस्ताद व पैलवान , पालक वर्ग यांच्या मार्फत 
संपन्न झालायेणाऱ्य पिढीला व्यायामाची आवड लागावी, व्यसनमुक्त व्हावे
पिळदार शरीर  व्हावे, यासाठी एक छोटासा प्रयत्न

Sunday, April 7, 2024

मोही मध्ये योगा उत्साहात संपन्न

आज सोमवार दिवसाची सुरुवात योगा नी झाली
सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन योगाचा आनंद लुटला त्यावेळेस जिल्हा प्राथमिक शाळा मोही यांचे खूप मोठे योगदान लाभले विद्यार्थी शिक्षक वर्ग प्राध्यापक सहभागी होऊन योगाचा आनंद लुटला व मोलाचे मार्गदर्शन केले.
सर्वांना व्यायामाचे आवड लागावे व युवा पिढी वेसन मुक्त व्हावे

त्यावेळेस योग गुरु श्री सचिन जठार सर व सौ .शैला विजय देवकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व योगाचे महत्व पटवून दिले..
सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद

पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

श्री महालक्ष्मी कुस्ती मैदान ,मोही2024 श्री गणेशा

आज दिनांक 07 एप्रिल 2024 वार रविवार रोजी
श्री महालक्ष्मी कुस्ती मैदान,मोही 2024
याचे पावती पुस्तक सर्व ग्रामस्थांच्या वतीने पूजन करण्यात आले.

कुस्तीचे परंपरा लाभलेल व वसा आणि वारसा जपणारा मोही ग्रामस्थ

यांच्यामार्फत मोठ्या उत्साहात यावर्षी कुस्ती मैदान होणार

Thursday, April 4, 2024

मोही गावात नवीन सरपंच तालमीतील मुलांना प्रोत्साहन

मोही गावामध्ये नवीन सरपंच निवडण्यात आले

त्या म्हणजे सौ.वंदना श्रीमंत पवार यांनी आज म्हणजे ०४/०४/२०२४ रोजी मोहिचा सरपंच पदाचा भार सांभाळला

सौ वंदना श्रीमंत पवार यांचे सरपंच पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.......
त्यावेळेस  पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) व श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही यांच्यामार्फत त्यांचा छोटासा सत्कार समारंभ करण्यात आला
त्यावेळेस बोलताना सरपंच मॅडम म्हणाल्या सर्व खेळाडू वस्ताद मंडळींना आमच्यातर्फे होईल ती मदत करू
त्यावेळेस सरपंच मॅडमनी मुलांना खुराकासाठी धनादेश दिला . ग्रामपंचायत तर्फे कोणतीही मदत लागल्यास मुलांना आम्ही मदत करतो अशा म्हणाले.


शुभेच्छुक-
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)
  श्री बिल्वेश्वर कुस्ती संकुल, मोही

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व इतिहास

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.[१] याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...