*क्रीडा रत्न पुरस्कार 2025*
प्रदान करण्यात येणार आहे.
तरी पैलवान किरण भगत यांचा कुस्तीतील धावता आढावा
2016 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात धुमाकूळ घालणारा पैलवान किरण भगत,2019 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रापासून विविध कारणांमुळे दुरावला होता.
सततच्या दुखापती हे त्यातील प्रमुख कारण.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचा मोही गावचा पैलवान वडील नारायण भगत हे सुद्धा एकेकाळचे पट्टीचे पैलवान.
घरगाडा सांभाळण्यासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली.मुंबईत हमाली करुन त्यांनी किरण ला कुस्तीसाठी नेहमी पाठबळ दिले.
महाराष्ट्राच्या मैदानी कुस्तीत बाहेरून आकडी या डावावर किरण भगत ने अनेक कुस्ती शौकिनांच्या मनात घर केले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपविजेता असणाऱ्या किरण भगत चा चाहता वर्ग महाराष्ट्रात मोठा आहे.
कोरोना महामारीनंतर 2 वर्षे महाराष्ट्रात शड्डू घुमले नाहीत.मात्र,या कुस्ती मोसमाला मोठ्या ताकदीने सुरवात होताना दिसत दिसत होती.
किरण मध्यंतरी दिल्लीत छत्रसाल स्टेडियम मध्ये सराव करत होते.सध्या ते आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे येथे सरावास आहे.
कुस्ती करियर मध्ये अनेक चढउतार पाहिलेल्या किरण ने पाहिले आहेत.
पैलवान किरण भगत न थांबता परत मैदानात उतरला तब्बल चार वर्षांनी व त्यांनी दाखवून दिले की कष्टापुढे नशिबीही कमी पडते.
2017 ला पिंजऱ्यातील कुस्ती पूर्ण भारतभर गाजली. त्याचबरोबर कुंडल कुस्ती मैदान मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्यावरती 27 मिनिटांनी विजय मिळवला. अशा अनेक कुस्त्या महाराष्ट्रभर गाजल्या.
सध्याला चार वर्षे झाले
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) एक फाउंडेशन सुरुवात करून ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले जाते, सार्वजनिक तसेच शैक्षणिक अनेक उपक्रम राबवले जातात व सर्वांना प्रेरणा देणारे असे कार्य केले जातात.
महाराष्ट्राचा अभिमान उपमहाराष्ट्र केसरी
पैलवान किरण नारायण भगत
यांना त्रिमूर्ती प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ चांदखेड यांच्या वतीने क्रीडा पुरस्कार 2025 प्रधान करण्यात येत आहे.
मा श्री पोरस बारमुख
(मा. उपसरपंच)
(त्रिमूर्ती प्रतिष्ठान उपाध्यक्ष)
मा श्री संकेत बावकर
(मा. उपसरपंच)
(त्रिमूर्ती प्रतिष्ठान खजिनदार)
(वि. ग्रा. पं. सदस्य)
सर्व टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद...
No comments:
Post a Comment